गणेशोत्सव 2023: एक्झर्बिया अबोड सोसायटीत गणपती बाप्पा विराजमान
भैरवनाथ भजन मंडळाच्या सुश्राव्य गायनाने सोसायटीतील रहिवाशी मंत्रमुग्ध
![Ganeshotsav 2023: Ganapati Bappa is seated in Exerbia Abode Society](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/Bhajan-780x470.png)
वडगाव (मावळ) : सोसायटीमधील रहिवासांमध्ये एकोपा, एकता, समता, बंधुता, भाईचारा नांदावा, तसेच येथील रहिवाशांना सण, उत्सव आणि भारतीय संस्कृतीची माहिती व्हावी, या हेतूने एक्झर्बिया अॅबोड रहिवाशी सोसायटीमध्ये गेल्या तीन वर्षांपासून गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी या सोसायटीमध्ये गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. त्यानिमित्त संपूर्ण गणेशोत्सवातील 10 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दिनांक 20 सप्टेंबर रोजी भैरवनाथ भजन मंडळ जांभुळगाव या भजनी मंडळाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
![Ganeshotsav 2023, exerbia abode, in society, Ganapati Bappa, seated,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/Bappa-300x169.png)
यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रसन्न शिरोडकर, उपाध्यक्ष सुनील पवार, खजिनदार पंढरीनाथ हिंगे, सचिव दिनेश सकट, दीपक पाटील यांनी गळ्यात टाळ घेऊन भजनात सहभाग नोंदवून मंत्रमुग्ध झाल्याचे पहायला मिळाले.
तसेच सायंकाळच्या बाप्पाच्या आरतीमध्ये योगेश हुळे-सुजाता हुळे, कविता क्षीरसागर, सार्थक क्षिरसागर, संकेत क्षिरसागर, तानाजी आढाव, रंजना आढाव यांनी सहभाग घेतला.
यावेळी एक्झर्बिया अॅबोड सोसायटीमधील महिला भजनी मंडळाने देखील उत्तम साथ देत सुश्राव्य अभंग, गौळणी गायल्या. यावेळी सत्यभामा कोरके, कलावती फुलगमवार या महिला भजनी मंडळाने सहभाग नोंदवित उपस्थितांकडून दाद मिळवली.