Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र
गडचिरोलीत चकमक; पोलिसांकडून १३ नक्षलवादी ठार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/naxal-2-1.jpg)
गडचिरोली – गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. एटापल्ली तालुक्यातील पैडीच्या जंगलात झालेल्या या चकमकीत पोलिसांनी १३ नक्षलवाद्यांना ठार केलं आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सी-६० युनिटकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
अद्यापही या भागात शोधमोहिम सुरू असून हा संपूर्ण भाग छत्तीसगडच्या सीमेनजीक असल्याची माहिती समोर येत आहे. या भागात नक्षलवाद्यांचा वावर असतो. काही दिवसांपूर्वीच येथील पोलीस चौकीवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. यावेळी सुदैवाने रॉकेटलाँचरच्या हल्ल्यात कोणतेही नुकसान झाले नाही. यानंतरच पोलिसांनी नक्षलवादविरोधी अभियान राबवले होते. या अभियानाअंतर्गतच गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळच्या दरम्यान चकमक झाली. नक्षलवाद्यांचे अनेक म्होरके यामध्ये मारले गेल्याची माहिती आहे.