माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर

Padma Awards 2026 : केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज (२५ जानेवारी) पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. पद्मश्री, पद्मविभूषण आणि पद्मभूषण असे तीन पुरस्कार प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्याची प्रथा आहे. त्यानुसार ही घोषणा करण्यात आली आहे.
विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. यामध्ये महाराष्ट्रातील देखील काही दिग्गज व्यक्तींचा समावेश आहे. रघुवीर खेडकर, आर्मिडा फर्नांडिस आणि श्रीरंग लाड यांनाही हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या बरोबरच महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
हेही वाचा –युनिफाईट कुस्ती स्पर्धेत पिंपरी-चिंचवडचा डंका; १३ खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
भगतसिंह कोश्यारी हे २०१९ ते २०२३ या दरम्यान महाराष्ट्राचे राज्यपाल होते. भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राच्या राज्यपाल या पदावर असताना त्यांच्या वक्तव्याची मोठी चर्चा झाली होती. अनेक आक्षेपार्ह वक्तव्ये भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते. त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं. आता याच भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.




