ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

बोऱ्हाडेवाडीतील भूमिपुत्रांसाठी आमदार लांडगे यांचा पाठपुरावा

निवासी क्षेत्र प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत बोऱ्हाडेवाडीचा समावेश १९९७ मध्ये करण्यात आला. मात्र, अद्याप येथील जमीनी शेती क्षेत्र (ॲग्रिकल्चरल झोन) म्हणून कागदोपत्री नोंदीत आहेत. शहराचा विकास झपाट्याने होत असून, वाढत्या लोकसंख्येनुसार शेती क्षेत्राचे निवासी क्षेत्रात (आर झोन) मध्ये रुपांतर करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या मंजूर विकास योजनेत आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नियोजन नियंत्रणाखाली येणाऱ्या बोऱ्हाडेवाडी येथील दोनशे एकर क्षेत्र शेती विभागातील जमीन निवास क्षेत्रात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव महापालिका सर्वसाधारण सभेत सभा ठराव क्र. ५३३ दि. दि. २० ऑक्टोबर २००८ रोजी मंजूर करण्यात आला. त्यानंतर तसेच, सर्वसाधारण सभेत दि. २० नोव्हेंबर २०१९ रोजी ठराव आणि उपसूचना मंजूर करण्यात आली. तसेच, दि. ४ मे २०२० रोजीच्या सर्वसाधारण सभेतील ठरावानुसार फेरबदल प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. गेल्या १६ वर्षांपासून हा प्रस्ताव राज्याच्या नगरविकास विभागाकडे प्रलंबित आहे.

बोऱ्हाडेवाडीच्या सभोवताली मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले असताना मात्र, या भागाचा विकास झालेला नाही. कारण, शेती क्षेत्रात विविध विकास योजना राबवण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. हरित क्षेत्र असल्यामुळे या गावातील शेतकऱ्यांना बांधकाम करण्यासाठी महापालिका बांधकाम विभाग परवानगी देत नाही. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारकडून स्थानिक भूमिपुत्रांना अपेक्षा आहेत, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

भोसरी विधानसभा मतदार संघाचा विचार करता, महापालिका हद्दीत समाविष्ट झालेली गावे २० वर्षे विकासापासून वंचित राहिली आहेत. तेथील पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यासाठी तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. २०१७ मध्ये महापालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता आली. त्यानंतर समाविष्ट गावांच्या विकासाला चालना देण्यात आली. आगामी काळात समाविष्ट गावांना न्याय देण्याच्या हेतूने राज्य सरकारने बोऱ्हाडेवाडीतील हरित क्षेत्र निवासी करण्याबाबतचा गेल्या १६ वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. निश्चितपणे हा विषय मार्गी लागेल, असा विश्वास वाटतो.

  • महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button