धक्कादायक! जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये आरपीएफ जवानाकडून गोळीबार, ४ जणांचा मृत्यू
मुंबई : जयपूर-मुंबई एक्सप्रेसच्या B-५ बोगोमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. आरपीएफ जवानाकडून हा गोळीबार करण्यात आला आहे. त्यानंतर आरपीएफ जवान चेतन कुमार यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
आरपीएफ जवान चेतन कुमार याने सहाय्यक पोलीस निरीक्षक टिका राम यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात टिकाराम यांच्यासह आणखी ३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. जयपूरवरून मुंबईकडे ट्रेन येत असताना पालघर ते विरारदरम्यान गोळीबाराची घटना घडली आहे.
हेही वाचा – आता सात वर्षांत विकता येतील एसआरए घरे, पूर्वी 10 वर्षांचा होता लॉक इन कालावधी
#WATCH | CPRO Western Railway, says "An unfortunate incident has been reported today in Mumbai-Jaipur Superfast Express. An RPF constable, Chetan Kumar opened fire on his colleague ASI Tikaram Meena and during the incident, three other passengers were also shot. According to a… pic.twitter.com/mzVnz7Rn7v
— ANI (@ANI) July 31, 2023
बोरीवली लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरू आहे. आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यानंतर आजच त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरपीएफच्या माहितीनुसार, रेल्वे प्रवासादरम्यान काही अनुचित घटना घडू नये, यासाठी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या जवानांना तैनात केले जाते.