Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
तारापूर औद्योगिक वसाहतीतल्या कंपनीला आग; जिवीत हानी झाली नसल्याचा प्राथमिक अंदाज
![Fire at company in Tarapur industrial estate; Preliminary estimate of no loss of life](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/pjimage-1.jpg)
तारापूर |
तारापूर औद्योगिक वसाहती मधली फ्लॉट नंबर L -9/4 रंग रसायन या फॅक्टरीमध्ये मध्यरात्रीनंतर भीषण स्फोट होऊन आग लागली. सणानिमित्ताने कंपनी बंद असल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मध्यरात्रीनंतर अडीच वाजण्याच्या सुमारास या कंपनीमध्ये स्फोट होऊन आग लागली. तारापूर एमआयडीसी अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि पहाटेपर्यंत आग नियंत्रणात आली आहे. घटनास्थळी बोईसर पोलिस स्टेशनचे अधिकारी उपस्थित आहेत. आग विझल्यानंतर संभाव्य जखमींचा शोध घेण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.