breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

पिंपरी-चिंचवडमधील कंपनीला भीषण आग; सात जणांचा होरपळून मृत्यू

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील तळवडे येथे एका फायर कँडल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये आगीमध्ये सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाची वाहने पोहोचली असून जखमी व्यक्तींना रूग्नालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा  –  ‘अजितदादांनी मलिकांना जर घेतलं नाही, तर खरा पिक्चर सुरू’; बच्चू कडूंचं विधान चर्चेत

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी तीनच्या सुमारास तळवडे येथील फायर कँडल कंपनीला भीषण आग लागली. या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अद्याप मृतांची ओळख पटली नाही. घटनास्थळी चिखली आणि देहूरोड पोलीस त्याचबरोबर अग्निशमन दलाचे वाहने पोहोचली आहेत. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून फायर कँडल कंपनी जळून खाक झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button