TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

वीज समस्या सोडवण्यासाठी पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण

  • राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हिरवा कंदील
  • आमदार लांडगे यांच्या पाठपुराव्याने उपकेंद्र उभारण्याची तयारी

पिंपरी । प्रतिनिधी
भोसरी विधानसभा मतदार संघातील निवासी आणि आद्योगिक पट्टयातील वीज समस्या सोडवण्यासाठी राज्याचे ऊर्जा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून, उद्योजकांसह सर्वसामान्य नागरिकांना अखंडित वीज पुरवठा सुरू करण्यासाठी पाभाभूत सुविधा सक्षम केल्या जाणार आहेत, अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिली.


राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार लांडगे यांनी मुंबईत भेट घेतली. त्यावेळी भोसरी मतदार संघातील वीज समस्या सोडवण्याबाबत सविस्तर निवेदन देण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भोसरी विधानसभा मतदार संघात औद्योगिक आणि निवासी अशा दोन्ही पट्टयातील वीज ग्राहकांना नियमितपणे वीज समस्यांना सामोरे जावे लागत आहे. समाविष्ट गावांत मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली असून, त्या तुलनेत वीज यंत्रणा सक्षम करण्यात आलेली नाही. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी काही विकासकामे तात्काळ मार्गी लावणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने राज्य सरकारकडे खालीलप्रमाणे कामे प्रस्तावित आहेत. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध झाल्यास सदर कामे मार्गी लावता येतील.


आमदार लांडगे म्हणाले की, सफारी पार्क मोशी अतिउच्चदाब (ई.एच.व्ही.) उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी अंदाजे ८० कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे. मोशी, डुडुळगांव, आकुर्डी, चिखली, तळवडे या भागातील औद्योगिक व निवासी पट्टयातील वीज पुरवठा सुरळीत होणार आहे. चऱ्होली अतिउच्चदाब (ई.एच.व्ही.) उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. त्यामुळे भोसरी, चऱ्होली, दिघी, धानोरी या भागात पुरेशा दाबाने वीज पुरवठा करणे सुलभ होणार आहे. यासह भोसरी गावठाणे येथील नवीन स्विचिंग उपकेंद्र, भोसरी विधानसभा मतदार संघांतर्गत ओव्हरहेड वीज वाहिन्याचे भूमिगत वाहिन्यांमध्ये रुपांतर करणे सवस्तिर योजना राबवणे, तळवडे येथील देवी इंद्रायणी स्विचिंग उपकेंद्रातून स्वतंत्र फिडर बे व भूमिगत काम तातडीने करण्याची योजना राबवण्यात येणार आहे. यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, निधी उपलब्ध करुन कामे मार्गी लावण्यात येणार आहेत.
*
भोसरी उपविभागाची पुनर्रचना…
नवीन उपविभाग व शाखा कार्यालय स्थापित करणे :

भोसरी विभागांतर्गत भोसरी एमआयडीसी तसेच सभोवतालच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. औद्योगिक, घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांची संख्याही वाढलेली आहे. त्यामुळे ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा देण्यासाठी कुशल प्रशासकी नियंत्रणासाठी भोसरी उपविभागाचे दोन उपविभाग करणे गरजचे आहे. नवीन उपविभाग स्थापन केल्यास खालीलप्रमाणे पुनर्रचना प्रस्तावित आहे. त्यामुळे भोसरी उपविभाग क्र. १ चे विभाजन करुन भोसरीगांव शाखा कार्यालय, नाशिकरोड शाखा कार्यालय, चऱ्होली शाखा कार्यालय निर्माण करण्यात येईल. तसेच, भोसरी उपविभाग क्र. २ चे विभाजन करुन इंद्रायणीनगर शाखा कार्यालय आणि मोशी शाखा कार्यालय प्रस्तावित आहे.
*
भोसरी विभागांमधील वाढत्या शहरी करणाचा विचार करून चऱ्होली, मोशी येथे अतीउच्च दाब उपकेंद्राचे प्रस्ताव सादर केले आहेत. तसेच, मुख्य अभियंता , पुणे परिमंडळ यांचे सूचनेप्रमाणे भोसरी येथील सेंच्युरी इंका या अतीउच्य दाब उपकेद्र मध्ये दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवणेचा प्रस्ताव आहे. यासह मध्यम दाब स्वीचिंग स्टेशनसाठीही प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे रहिवासी भागात तसेच औद्योगिक ग्राहकांना विजेची चांगली सेवा देणे सोयीचे होईल.

  • उदय भोसले, कार्यकारी अभियंता, भोसरी विभाग, महावितरण.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button