breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

EVM वर निवडणूक होणार की नाही? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली : देशातील अनेक राजकीय पक्ष आणि नेते वारंवर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या विश्वासहर्तेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करत असतात. खासकरुन पराभव झाला की, EVM मशीनमुळे आपण हरलो, या मशीनमध्ये घोटाळा करुन विजय मिळवता येतो, असा काही नेत्यांचा, पक्षांचा दावा असतो. महापालिका निवडणूक असो, विधानसभेची किंवा लोकसभेची निकाल जाहीर झाला की, हरलेला पक्ष किंवा विरोधी पक्षातली मंडळी EVM च्या विश्वासहर्तेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करतात. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये कसा घोटाळा करता येऊ शकतो, त्याच सादरीकरण करतात. आता लोकसभा निवडणुकीचा काळ आहे. कधीही लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमांची घोषणा होऊ शकते. अशावेळी EVM विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

हेही वाचा – ..तर ४८ पैकी एकही खासदार निवडून येऊ देणार नाही; मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा

एक नाही, तर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनबद्दल आक्षेपाच्या वेगवेगळ्या याचिका होत्या. आता सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला मोठा दिलासा मिळाला आहे. ईव्हीएम बाबत दाखल करण्यात आलेल्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या कामकाजात अनियमितता असल्याचे आरोप करणाऱ्या याचिका फेटाळल्या आहेत. लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी निवडणूक आयोगासाठी हा मोठा दिलासा आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button