Shirdi Sai Baba : साईचरणी गुरूपौर्णिमा उत्सवात सात कोटींचे दान!
![Donation of 7 Crores in Saicharani Guru Poornima Utsav](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/shirdi-sai-baba-780x470.jpg)
Shirdi Sai Baba : शिर्डीतील साईबाबांचे मंदिर चांगलेच प्रसिद्ध आहे. येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यातच या गुरूपौर्णिमा उत्सवात २ लाख भाविकांनी साई समाधीचे दर्शन घेतले आहे. या उत्सव काळातील ३ दिवसांच्या दानाची मोजणी करण्यात आली आहे. या तीन दिवसात ७ कोटी ३ लाख रूपयांची देणगी प्रप्त झाली आहे. देणगीत मागील वर्षींच्या तुलनेत या वर्षी ३ कोटी रूपयांच्यावर वाढ झाली आहे.
साईबाबा चरणी तीन दिवसांत तब्बल सात कोटींचं दान अर्पण करण्यात आलं आहे. दक्षिणा पेटीत २ कोटी ६५ लाख, देणगी काउंटरवर एक कोटी १८ लाख, २५ लाख रूपये किमतीचे ४७२ ग्रॅम सोने तर २ लाख ६३ हजार रूपये किमतीची साडेचार हजार किलो चांदी अर्पण करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त ऑनलाईन पासेसद्वारे एकुण ६७ लाख ३३ हजार रूपयांचे उत्पन्न संस्थानला प्रप्त झाले आहे.
हेही वाचा – ‘शरद पवारांनी जे पाप केलं ते त्यांना आता फेडायला लागत आहे’; डॉ. शालिनीताई पाटील यांची खोचक टीका
दरम्यान, भाविकांकडून मिळालेल्या देणगीतून संस्थान विविध भक्तोपयोगी आणि समाजोपयोगी कामे करते. साईसंस्थानचे साईनाथ रूग्णालयात नि:शुल्क तर साईबाबा रूग्णालयात माफक दरात वैद्यकीय उपचार करण्यात येतात. मोठ्या आजारांसाठी गोरगरीब रूग्णांना वैद्यकीय अनुदान देण्यात येते. प्रसादालयात मोफत अन्नदान करण्यात येतेय वर्षाकाठी जवळपास दीड कोटी भाविक याचा लाभ घेतात. संस्थानच्या शैक्षणिक संकुलात सहा हजार विद्यार्थी नाममात्र दरात ज्ञानार्जन करत आहेत.