breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

PMPML कडून शाळांतील विद्यार्थ्यांकरिता अनुदानित पासेसचे वितरण

पुणे : पुणे परिवहन महामंडळाकडून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील प्राथमिक, माध्यमिक व खासगी शाळेतील इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी सवलतीचे अनुदानित बस पास वितरणाची योजना पीएमपीएमएलतर्फे सुरु करण्यात आली आहे.

सदर पासेससाठी अर्ज सर्व आगार व पासकेंद्रावर वितरीत करण्यात येतील. सबंधित शाळांचे प्रमुख अथवा प्रतिनिधी आपल्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरून एकत्रित रित्या महामंडळाच्या कोणत्याही आगारांमध्ये जमा केल्यास त्या शैक्षणिक संस्थेला एकत्रित पास देण्यात येतील.

हेही वाचा – धक्कादायक! पुणे-सोलापूर महामार्गावरील अपघातात वारकऱ्याचा मृत्यू

May be an image of 6 people and text that says "PMPML पिंपरी- चिंचवड मनपा हद्दितील विद्यार्थ्यांकरिता पीएमपीएमएल कडून सन २०२३-२०२४ २०२४ करिता अनुदानित पासेसचे वितरणाबाबत DADDD पिंपरी-चिंचवडे महानगरपालिकेच्या शाळेतील इयत्ता ५ वी ते वीच्या विध्या्थ्यांना १००% अनुदानित मोफत बस प्रवास पास पिंपरी- चिंचवड मनपा हद्दितील खाजगी शाळेतील इयत्ता ५ वी १० विच्या विद्यार्थांना ७५% अनुदानित मोफत बस प्रवास पास ববব"

खासगी शाळेतील विद्यार्थांना त्यांची आवश्यक कागदपत्रे व अर्ज तपासून अंतरानुसार होणारे एकूण पासचे रकमेच्या २५% रक्कमेनुसारचे चलन तयार करण्यात येईल. ते चलन विद्यार्थ्यांनी पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील बँक ऑफ बडोदाच्या कोणत्याही शाखेमध्ये भरणा केल्या नंतर अर्जासोबत चलन आवश्यक कागदपत्रे जोडून जवळच्या आगारामध्ये सादर करून आपला पास घ्यायचा आहे.

योजनेसंबधी सविस्तर माहिती महामंडळाच्या सर्व आगारामध्ये उपलब्ध आहे. तरी पिंपरी-चिंचवड मनपाच्या शाळेतील व पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीत असलेल्या खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांनी या सवलतीच्या पासचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button