साईबाबांवरील प्रश्नावर धीरेंद्र शास्त्रींचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, साईबाबांना संत नाहीत
साईबाबांना फकीर म्हणू शकतो, पण ईश्वर नाही
![Dhirendra Krishna Shastri said that Sai Baba can be called Fakir, but not God](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/Dhirendra-Krishna-Shastri-780x470.jpg)
बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री वादग्रस्त वक्तव्यामुळे सातत्याने चर्चेत असतात. दरम्यान त्यांनी शिर्डीचे साईबाबा यांच्याबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एका कार्यक्रमात शास्त्री यांना सवाल करण्यात आला की, साई बाबांची पूजा करावी की करू नये? यावर शास्त्री म्हणाले, गीदड की खाल ओढकर कोई शेर नही बन सकता, असं म्हणाले.
जबलपूरमध्ये धीरेंद्र शास्त्री भगवत गीतेचं पारायण करत होते. काल (१एप्रिल) या पारायणाचा शेवटचा दिवस होता. यावेळी शास्त्री आणि जमलेल्या लोकांमध्ये चर्चा सुरू होती. त्यावेळी एका व्यक्तीने शास्त्री यांना साई बाबांबद्दल प्रश्न केल्यावर शास्त्री यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं.
आमच्या धर्माचे शंकराचार्य यांनी साई बाबांना ईश्वराचं स्थान दिलेलं नाही. शंकराचार्य यांचं मत मानणं अनिवार्य आहे. त्यांच्या मताचं पालन करणं प्रत्येक सनातनी व्यक्तीचं कर्तव्य आहे. कारण ते धर्माचे पंतप्रधान आहेत. कोणतेही संत ते आपल्या धर्माचे असोत अथवा दुसऱ्या त्यांना ईश्वराचं स्थान देता येणार नाही, असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले.
कोणतेही संत ते तुलसीदास असतील, सूरदास असतील किंवा इतर कोणतेही ते केवळ महापुरूष आहेत, परंतु ते ईश्वर नाहीत. मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत. परंतु मी हे बोलणंदेखील गरजेचे आहे की, गिधाडाची चामडी पांघरून कोणी सिंह होत नाही. याला लोक वादग्रस्त वक्तव्य म्हणतील पण हे बोलणं खूप गरजेचं आहे. आपण साईबाबांना संत म्हणू शकतो, फकीर म्हणू शकतो, पण ईश्वर नाही, असंही धीरेंद्र शास्त्री म्हणाले.