Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

लाडक्या बहिणींना महापालिका निवडणूकीपूर्वी मिळणार खुशखबर; खटाखट जमा होणार ३ हजार रुपये

CM Ladki Bahin Yojana :  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात ३१ डिसेंबर २०२५ रोजी नोव्हेंबर महिन्याचा १५०० रुपयांचा हफ्ता जमा झाला. डिसेंबरअखेर असल्याने थकीत तीन महिन्यांचे एकत्रित ४५०० रुपये मिळतील, अशी आशा महिलांना होती; मात्र प्रत्यक्षात केवळ एकच हफ्ता आल्याने अनेकींचा अपेक्षाभंग झाला.

मात्र लाडकी बहीण योजनेच्या पुढील हफ्ताबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महापालिका निवडणुकांसाठी मतदान येत्या १५ जानेवारीला होणार असून त्यापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन हफ्ते म्हणजे ३ हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.

हेही वाचा –  पार्लमेंट ते पालिका एकाच विचाराची सत्ता असेल, तर विकासकामांना गती!

मकरसंक्रातीपूर्वी महिलांना दोन महिन्याचे तीन हजार रुपये मिळणार आहेत. लाडक्या बहीण योजनेसाठी पात्र महिलांनी केवायसी करण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत होती. आता ती मुदत संपली असल्याने केवायीस केलेल्या महिल्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.

दुसरीकडे, ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी न केलेल्या महिलांना २०२६ पासून या लाभाला मुकावे लागण्याची शक्यता आहे. तसेच आता साइटवरून ई-केवायसीचा ऑप्शन देखील हटवण्यात आला आहे. तर तांत्रिक कारणांमुळे ज्यांना एसएमएस आले नाहीत, त्यांनी बँक पासबुक तपासून खात्री करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button