संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याची अखेरची मुदत; अजित पवारांनीचे स्पष्टीकरण
![अलीकडच्या काळात विकासाचे मुद्दे सोडून बाकीच्या मुद्द्यांवर बरीच चर्चा - अजित पवार](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/Deadline-for.jpg)
मुंबई | गेल्या पाच महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. ३१ मार्चपर्यंत एसटीचे कर्मचारी कामावर रुजू झाले नाही तर कठोर कारवाई होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. आज संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याची अखेरची मुदत आहे. संपकरी कामावर रुजू न झाल्यास काय कारवाई होऊ शकते, असा प्रश्न सध्या चर्चेत आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.
‘३१ तारखेपर्यंत मागे ज्या काही घटना घडल्या तेव्हा परिवहन मंत्री अनिल परब यांनी सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे ३१ तारखेपर्यंत सर्वांना संधी दिली. मात्र, आज कामावर रुजू न झाल्यास उद्यापर्यंत कठोर निर्णय घेतला जाणार आहे, अशी साधारण शक्यता आहे,’ अशा इशारा अजित पवारांनी दिला आहे.
तसंच, ‘संपकरी कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई होऊ शकते याबाबत विचारलं असता त्यांनी, वेळ पडली तर ज्यांना काढून टाकलं आहे. त्यांना बाजूला काढून नवीन भरती पण होऊ शकते, अशी शक्यता पवारांनी व्यक्त केली आहे. तसंच, पुण्यात पंतप्रधानांच्या हस्ते इलेक्ट्रिक बसचे उद्धाटन करण्यात आलं. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक बसचा पर्यायही विचारात आहे. पुण्यात इलेक्ट्रिक बसची खरेदी करुन एका कंपनीने पीएमपीएलला चालवायला दिल्या आहेत. तो हिशोब काढला तर आत्ताच्या खर्चापेक्षा कमी खर्च होतो,’ असंही अजित पवारांनी सांगितलं आहे.
‘एसटी कर्मचाऱ्यांना १० तारखेला पगार देण्याचे कबुल केलं आहे. एसटीचे विलनीकरण शक्यच नसल्याचंही पवारांनी म्हटलं आहे. तसंच, कर्मचाऱ्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्यांना वाढवून दिल्या आहेत. पगारही वाढवून दिला आहे, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. कोर्टाने दिलेली मुदत संपली तर कठोर कारवाईचा अधिकार मंत्रिमंडळाला असतो,’ असंही ते म्हणाले.