#COVID19 : 10 हजार गरजू व गरीब नागरिकांना श्रीराम धान्य प्रसादाच्या किट्स वितरीत होणार : आ. सुधीर मुनगंटीवार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/7-1.jpg)
बल्लारपूर। महाईन्यूज । प्रतिनिधी
माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात (जि.चंद्रपूर) 10 हजार गरजू व गरीब नागरिकांना श्रीराम धान्य प्रसादाच्या किट्चे वितरण करण्याचा संकल्प जाहीर केला होता. या उपक्रमाचा शुभारंभ आज 2 एप्रिल रोजी बल्लारपूर शहरात करण्यात आला.
श्रीराम धान्य प्रसाद म्हणून वितरीत करण्यात येणा-या या जीवनाश्यक वस्तुंच्या किटमध्ये आटा (गव्हाचीकणीक) , तांदुळ, बेसण, तेल, मीठ, मिर्ची हळद, पारले, बिस्कीट, साखर, चहापत्ती, डेटॉल,बटाटे व कांदे या वस्तुंचा समावेश आहे.आज बल्लारपूर शहरातील श्रीराम मंदीरात भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल व नगराध्यक्ष हरीश शर्मा यांच्या हस्ते सदर किटची पूजा करून वितरण प्रक्रियेला प्रारंभ करीत, यावेळी हरीश शर्मा, राजू गुंडेट्टी, काशी सिंह, आशिष देवतळे, कमलेश शुक्ला, प्रकाश धारणे यांची प्रामुख्याने उपस्थीती होती. पंडीत दिनदयाल वार्डातून गरीब, गरजूंना किट वितरीत करून उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
सदर श्रीराम धान्य प्रसादाचे वितरण बल्लारपूर शहरासह बल्लारपूर तालुका, पोंभुर्णा शहर व तालुका, मुल शहर व तालुका तसेच चंद्रपूर तालुक्याच्या ग्रामीण भागात करण्यात येणार असल्याचे सांगत कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गरजू व गरीब नागरिकांच्या पाठिशी भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभी असल्याचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.