#CoronaVirus: सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८९
![# Covid-19: Decline in the number of active patients in the country, today only 1,84,408 active patients - Ministry of Health](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/coronavirus_topic_header_1024.jpg)
सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाबाधीत रुग्णांची संख्या ८९ झाली आहे. मुंबई, पुणेसारख्या रेड झोनमधून जिल्ह्य़ात चाकरमानी येत असून ७१ हजार चाकरमानी आले असल्याची नोंद झाली आहे.
सामान्य रुग्णालयास प्राप्त झालेल्या ८७ करोना तपासणी अहवालांमध्ये २अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर ८५ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये कुडाळ तालुक्यातील १, वैभववाडी तालुक्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. हे दोन्ही रुग्ण मुंबई येथून जिल्ह्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ८९ झाली आहे. जिल्ह्यात एकूण २४ हजार ९२१ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात असून त्यापैकी ५७९ व्यक्ती या शासकीय संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत. तर २३ हजार १७ व्यक्तींना गावपातळीवरील संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
नागरी क्षेत्रात १ हजार ३२५ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. तर जिल्ह्यात प्रवेश केलेल्या इतर सर्व नागरिकांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण २ हजार १३८ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी २ हजार ३० तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील ८९ अहवाल पॉझिटीव्ह आले असून उर्वरीत १ हजार ९३८ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून १०८ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या १२० रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी ६७ रुग्ण डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये, ४५ रुग्ण डेडिकेटेड कोवड हेल्थ केअर सेंटरमध्ये, कोविड केअर सेंटरमध्ये ८ रुग्ण दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत ७ हजार ३५१ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील एकूण ८९ करोनाबाधीत रुग्णांपैकी ८ रुग्ण उपचारानंतर तंदुरुस्त झाले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. एक रुग्ण उपचारासाठी मुंबई येथे गेला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ मेपासून आज अखेर एकूण ७० हजार ७७ व्यक्ती दाखल झाल्या आहेत.