breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: रायगडमध्ये दिवसभरात १८ रुग्ण वाढले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/233870dd7a5080ee7251772c50435b32.jpg)
अलिबाग – रायगड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात करोनाचे १८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १४६ वर पोहोचली आहे. अलिबाग तालुक्यातही करोनाचा शिरकाव झाला आहे. सोमवारी पनवेल मनपा हद्दीत ९, पनवेल ग्रामीण हद्दीत ७ तर अलिबाग आणि उरण येथे करोनाचे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.