Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: रायगडमध्ये दिवसभरात १७ कोरोना बाधित रुग्ण वाढले; चौघांचा मृत्यू
रायगड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात करोनाचे १७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या २०७ वर पोहोचली. पनवेल मनपा हद्दीत ८, पनवेल ग्रामीण हद्दीत ७ रुग्ण तर अलिबाग येथे १ रुग्ण आढळून आला. चिंताजनक बाब म्हणजे दिवसभरात करोनामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे. यात पनवेल मनपा हद्दीतील ३ तर ग्रामीण भागातील एका व्यक्तीचा समावेश आहे.