breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
#CoronaVirus: मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या दोन हजाराच्या उंबरठय़ावर
मुंबईमधील आणखी सुमारे १८३ जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असून करोनाबाधितांची संख्या १९३६ पर पोहोचली आहे. तर दोन करोनाबाधितांना बुधवारी प्राण गमवावे लागले. परिणामी, मुंबईमधील मृतांची संख्या ११३ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे बुधवारी १७ जणांना घरी पाठविण्यात आले आहे.