Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: महाराष्ट्रात १६०६ नवे कोरोना रुग्ण, संख्या ३० हजारांच्याही पुढे
महाराष्ट्रात आज १६०६ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या आज ३० हजार ७६ इतकी झाली आहे अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आज राज्यात ५२४ करोना रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत एकूण ७ हजार ८८ रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. सध्या राज्यात २२ हजार ४७९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे.