breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: “पोलीस आणि डॉक्टरांचा पगार कापण्यापेक्षा आमदारांचा १०० टक्के पगार कापा”
करोनाशी लढा देताना आर्थिक तिजोरीवर भार पडत असल्याने राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात ६० टक्के कपात करुन त्यांना ४० टक्के वेतन देण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली. दरम्यान दुसरकीडे पोलीस आणि डॉक्टरांचाही पगार कापला जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी यावरुन राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. गरज असेल तर आमदारांचा १०० टक्के पगार कापा असंही ते म्हणाले आहेत.