breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय
Coronavirus : देशात करोनाग्रस्तांची संख्या ५०३ वर, तर महाराष्ट्रात १०१ रुग्ण
करोनाग्रस्तांची देशातली संख्या ५०३ वर पोहचली आहे. तर महाराष्ट्रात ही संख्या १०१ वर पोहचली आहे. तर करोनामुळे आत्तापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. साताऱ्यात १ नवा रुग्ण आणि पुण्यात ३ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातली करोनाग्रस्तांची संख्या १०१ झाली आहे.
महाराष्ट्रानंतर सर्वाधिक रुग्ण आढळत आहे ते केरळमध्ये केरळमध्ये ही संख्या ६० च्या वर पोहचली आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ३० राज्यं लॉकडाउन करण्यात आली आहेत. तर महाराष्ट्र आणि पंजाब या दोन्ही राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.