breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: जि.प.चे १५ डॉक्टर ‘जीएमसी’त सेवा देणार
करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विभागीय आयुक्तांची दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या १५ वैद्याकीय अधिकाऱ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्याालयाकडे वर्ग करण्यात आले आहे. त्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी काढले. उद्यापासून ते डॉक्टर ‘जीएमसी’मध्ये सेवा देणार आहेत.