breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: चिंताजनक! राज्यभरात एक हजार पोलीस कोरोना पॉझिटिव्ह
!['That' farmer's wife lodged a complaint with the police against the tehsildar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/Maharashtra_Police_Seal.png)
राज्यात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आता आणखी एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. आतापर्यंत राज्यभरात तब्बल एक हजार एक पोलीस करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. करोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्या राज्यभरातील एक हजार एक पोलिसांमध्ये सध्या उपचार सुरू असले 851 जण, उपचारानंतर बरे झालेले 142 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या आठ जणांचा समावेश आहे.