breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
#CoronaVirus: गेल्या 24 तासांत सर्वाधिक रुग्णांची कोरोनावर मात, अशी आहे आजची आकडेवारी
![# Covid-19: “… Doesn't Feel Safe Next Year”](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/caught-in-corona-crossfire-how-the-current-crisis-has-vilified-the-c-word-and-a-mexican-beer-all-at-once-5.jpg)
मुंबई: 20 दिवसांत जवळपास देशात 62 ते 69 हजार नवीन रुग्णांची नोंद करण्यात येत होती मात्र एका दिवसांत आज दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे. 24 तासांत 62 हजारहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर 74.30 टक्के आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्र्यानं दिलेल्या नवीन आकडेवारीनुसार देशात 68 हजार 898 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. 24 तासांत 983 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर आतापर्यंत देशात कोरोनाग्रस्थांची संख्या 29 लाखावर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 54 हजार 849 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.