#CoronaVirus: गणपतीपुळेत शुकशुकाट; श्रींचे दर्शन प्रथमच बंद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/ganpatipule.jpg)
रत्नागिरी | महाईन्यूज
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे गणपतीपुळे देवस्थानने मंगळवारपासून (ता. 17) श्रींचे दर्शन बंद केले आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावले आहे. पर्यटकांचा ओघही कमी झाल्यामुळे बाजारपेठेसह समुद्र किनाऱ्यावरही शुकशुकाट पहायला मिळाला. मात्र हे पुळ्याच्या इतिहासात प्रथमच घडले आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/g1.jpg)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी मंगळवारपासुन (ता. 17) सुरु झाली आहे. त्यामुळे नेहमी गजबजलेले गणपतीपुळे पर्यटनस्थळावर शुकशुकाट दिसत होता. मुख्य मंदिराचा दरवाज्याला कुलूप लावण्यात आले असून पुजा-अर्चा करण्यासाठी फक्त पुजाऱ्यांना आतमध्ये प्रवेश दिला जातो. नेहमीच दर्शनासाठी येणाऱ्या भक्तगणांना मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेरील दोन हत्ती असलेल्या दरवाज्याजवळ उभे राहून नमस्कार करण्याची मुभा दिली होती.