breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: गडचिरोलीत आढळला आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण; एकूण संख्या पोहोचली सहावर
गडचिरोली जिल्हयात आणखी एक करोनाबाधित रुग्ण मंगळवारी आढळून आला. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ६ झाली आहे. सोमवारी जिल्ह्यात पहिल्यांदाच ५ करोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर जिल्ह्यात १० ठिकाणे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
दरम्यान, आज संध्याकाळी ७ वाजता एका रुग्णाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नव्याने आढळलेला रुग्ण हा आरमोरी तालुक्यातील शंकरनगर येथील केंद्रात संस्थात्मक विलगीकरणात होता. या रुग्णाने यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या ५ रुग्णांसोबत प्रवास केलेल्यांच्या संपर्कात आला होता, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे.
यामुळे आता शंकरनगर येथील रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात आणण्याची प्रक्रिया केली जाईल, असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.