breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

#CoronaVirus : कोरोनावर औषध शोधून काढल्याचा दावा भोंदू बाबाला चांगलाच भोवला

मुंबई| महाईन्यूज

जगभर थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत. यावर जगभरातील विविध शास्त्रज्ञ लस आणि औषधाकरिता संशोधन करत आहेत. त्यावर अजूनही उपाय सापडलेला नसताना पालघरमध्ये एका व्यक्तीला कोरोनावर औषध शोधून काढण्याचा दावा चांगलाच महागात पडला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र अनेक जण कोरोना विषाणूवर औषध असल्याचा दावा करून अफवा पसरवू लागल्याची उदाहरणे पुढे येत आहेत.

पालघरमधील विक्रमगड तालुक्यातील सारशी गावात राहणाऱ्या शशिकांत विजयनाथ पांडे नावाच्या इसमाने कोरोना विषाणूवर उपाय असल्याचा दावा केला होता. पांडे याने एका वनस्पतीच्या वेलीचा रस प्यायल्याने कोरोना पूर्णपणे बरा होतो, असा दावाच ठोकला आहे. एवढंच नाहीतर त्याने एक व्हिडिओ रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर टाकला होता. हा व्हिडिओ काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. पण, त्याच्या या दाव्यात कोणतेही तथ्य नव्हते.

अखेर समाजात अफवा पसरवून गैरसमज पसरविल्याने शशिकांत पांडे यांच्या विरोधात विक्रमगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button