Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: कोरोनाचं संकट गंभीर असलं तरीही सरकार खंबीर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/Untitled-19.png)
मुंबई लष्कराच्या ताब्यात देणार अशी एक अफवा पसरली आहे. लष्कर कशाला पाहिजे? आत्तापर्यंत जे काही केलं ते तुम्हाला सांगून करणार आणि तसंच करणार आहे. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे स्पष्ट केलं. महाराष्ट्रातले सगळे नागरिक हे सैनिकांसारखेच आहेत. करोनाचं संकट गंभीर असलं तरीही सरकार खंबीर आहे हे विसरु नका असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.