#CoronaVirus:वर्ध्यात विलगीकरणातील व्यक्ती रुग्णालयातून पळाला,गुन्हा दाखल
![# Covid-19: Decline in the number of active patients in the country, today only 1,84,408 active patients - Ministry of Health](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/coronavirus_topic_header_1024.jpg)
वर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असलेल्या व्यक्तीने जिल्हा सामान्य रुग्णालयातून उपचारादरम्यान पळ काढला. या घटनेमुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पोलीस विभागाची चांगलीच दमछाक झाली. अखेर या व्यक्तीला रोठा गावातून ताब्यात घेण्यात आले.
कोरोना विषाणूला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्याच्या सीमादेखील बंद करण्यात आल्या आहेत. तरीही अनेकजण जिल्ह्यात प्रवेश घेत आहेत. जिल्ह्यात दाखल झालेल्या एका व्यक्तीला 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात आलं होतं. मात्र, ही व्यक्ती क्वारंटाईनच्या नियमांचे उल्लंघन गावात सर्रास फिरत होता.
याबाबतच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे आल्या. त्यानंतर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी या व्यक्तीची आयटीआय टेकडी परिसरात संस्थात्मक विलगीकरणात रवानगी केली. संस्थात्मक विलगीकरणात असताना रविवारी त्या व्यक्तीची प्रकृती बिघडल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र, या व्यक्तीने सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान तेथून पोबारा केला. या घटनेने वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पोलीस विभागाची चांगलीच तारांबळ उडाली. पोलीस या व्यक्तीच्या शोधात लागले . अखेर ही व्यक्ती पुन्हा एकदा गावात फिरताना दिसून आली. याप्रकरणी नोडल अधिकारी साधना कोठेकर यांच्या तक्रारीहून सावंगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.