breaking-newsमहाराष्ट्र

#CoronaVirus:राज्यात दिवसभरात 3,752 नवे कोरोना रुग्ण

मुंबई : राज्यात आज (18 जून) दिवसभरात 3 हजार 752 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत . त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 20 हजार 504 वर पोहोचली आहे. राज्यात आज दिवसभरात 1 हजार 672 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत एकूण 60 हजार 838 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली .

राज्यात आतापर्यंत 5 हजार 751 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

राज्यात सध्या 53 हजार 901 रुग्णांवर उपचार सुरु आहे. दरम्यान, राज्यात आज दिवसभरात 100 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये 66 पुरुष तर 34 महिला रुग्णांचा समावेश आहे. राज्यात आज नोंद झालेल्या 100 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 45 रुग्ण आहेत, तर 46 रुग्ण हे वयवर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. याशिवाय 9 रुग्ण 40 वर्षांखालील आहे. राज्यात आतापर्यंत 5 हजार 751 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button