Breaking-newsमहाराष्ट्र
#CoronaVirus:धनंजय मुंडेंची कोरोनावर मात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/855561-dhananjay-munde-dna.jpg)
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयातून आज त्यांना घरी सोडले जाणार आहे.
१२ जूनला धनजंय मुंडे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. त्यांना श्वास घेताना त्रास जाणवत होता. त्यामुळे धनंजय मुंडे यांना तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
गेल्या ११ दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर त्यांनी कोरोनावर मात केली असून आज ते आपल्या घरी परततील. धनंजय मुंडे हे कोरोनावर मात करणारे महाविकासआघाडी सरकारमधील तिसरे मंत्री आहेत. यापूर्वी जितेंद्र आव्हाड आणि अशोक चव्हाण यांना लागण झाली होती. या दोन्ही नेत्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती