Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus:अकोला जिल्ह्यात कोरोनाचे 19 नवे रुग्ण
![# Covid-19: 14,989 new corona patients found in 24 hours in the country](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/corona_positive-3.jpg)
अकोला : जिल्ह्यात आणखी कोरोनाचे 19 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळं जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 1 हजार 361 वर पोहचली आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालात 8 महिला आणि 11 पुरुषांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील 5 जण अकोट फैल येथील, 3 जण गुलजारपुरा येथील, 3 जण लाडीस फैल, 2 जण हरिहर पेठ येथील तर उर्वरित राधाकृष्ण प्लॉट, आंबेडकरनगर, कमलानेहरू नगर, तारफैल, इंदिरा कॉलनी, गाडगेनगर येथील प्रत्येकी 1 – 1 याप्रमाणे रहिवासी आहेत.
आतापर्यंत जिल्ह्यात 73 जणांचा कोरोनाने बळी घेतला असून 990 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यात 297 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.