breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक; एका दिवसात आढळले ३७७ नवे रुग्ण
![In Aurangabad, 49 out of 100 people tested positive for corona](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/corona-virus-5008977_202009491941-e1630296545817-1.jpg)
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक दिसून येत आहे. काल जिल्ह्यात एका दिवसात तब्बल ३७७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले, तर ४६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे आता सक्रिय रुग्णांची संख्या १८४६ इतकी झाली आहे.
जिल्ह्यात १८४६ रुग्ण सक्रिय असून त्यापैकी आता ९५ रुग्ण लक्षणे असलेले आहेत, तर ११ रुग्ण सध्या ऑक्सिजनवर आहेत. उर्वरित १७५१ रुग्ण लक्षणे विरहित आहेत. जिल्ह्यात जळगाव शहर, भुसावळ हॉटस्पॉट ठरत आहे. काल जळगावात १५५, तर भुसावळ तालुक्यात १४४ नव्या बाधितांची नोंद झाली. त्यामध्ये जळगाव ग्रामीण ९, अमळनेर १३, चोपडा १५, भडगाव ७, यावल व जामनेर प्रत्येकी २, एरंडोल व रावेर प्रत्येकी ३, चाळीसगांव २० आणि पाचोरा, पारोळा व धरणगावमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.