आयोगाने राज्य सरकारचा OBC प्रस्ताव फेटाळला:निवडणुकीच्या तारखा जाहीर
![Commission rejects state government's OBC proposal: Election dates announced](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/maharashtra-election-commission.jpg)
मुंबई | प्रतीनिधी
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी होत होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार भंडारा आणि गोंदियातील जिल्हा परीषदेच्या निवडणुका देखील पुढे ढकलण्याच्या तयारीत होतं. मात्र निवडणूक आयोगाने राज्य सरकारला धक्का दिला आहे. कारण नियोजित निवडणूक कार्यक्रमात कोणताही बदल करण्यास नकार देण्यात आलाय. तसेच राज्य निवडणूक आयोगाने भंडारा आणि गोंदियासाठी मतदान व मतमोजणीच्या तारखा जाहीर केल्या आहेत.निवडणूक पुढे ढकलण्याबाबत राज्य सरकारचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाने फेटाळला
आता ओबीसी आरक्षणाशिवायच निवडणुका होणार
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय
21 डिसेंबरला ओबीसी आरक्षित जागा वगळता नियोजित जागांवर मतदान होणार
तर ओबीसी आरक्षित जागांवर खुल्या प्रवर्गातून 18 जानेवारीला निवडणूक होणार
दोन्ही मतदानांची एकत्रित मतमोजणी 19 जानेवारीला होणार
2 जिल्हा परिषद आणि 105 नगरपंचायतींमधील निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच होणार