राज्यातील महाविद्यालय १ फेब्रुवारीपासून सुरू होणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/CollegeProfessor_1920x1080-1024x576-1.jpg)
मुंबई |प्रतिनिधी
कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे राज्यातील महाविद्यालय बंद करण्यात आले होते. मात्र आता संसर्ग कमी झाल्यामुळे महाविद्यालय पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. राज्यातील महाविद्यालय प्रत्यक्ष 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. दरम्यान, महाविद्यालये सुरू करण्याच्या निर्णयाचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे.
राज्यातील महाविद्यालय प्रत्यक्ष 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. परंतु कोविडची परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचा अधिकार विद्यापिठ आणि स्थानिक प्रशासनाला असेल ज्या विद्यार्थ्यांचे दोन डोस पुर्ण झालेले आहेत त्यांनाच प्रवेश मिळणार. 15 फेब्रुवारीपर्यंत घेण्यात येणा-या परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्यात तर त्यानंतर परीक्षा ऑफलाईन घ्यायच्या किंवा ऑनलाईन याचा विचार स्थानिक पातळीवर घेण्याचा अधिकार आहे.
सोमवारपासून शाळा सुरु झाल्या. मात्र 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण सुरु असतानाही महाविद्यालयं सुरु करण्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नव्हता. शाळा सुरु होत असताना महाविद्यालयं कधी सुरु होणार असा असा प्रश्न होता. कोरोना काळात दोन वर्षे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असताना तिसऱ्या लाटेत पुन्हा महाविकास आघाडी सरकारने शाळांवर गंडांतर आणत शाळा महाविद्यालये बंद केली होती. राज्यात व देशात 15 वर्ष ते 18 वर्ष वयोगटातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू केले असताना कोरोना प्रादुर्भावाची लक्षणे कमी असल्याने इतर आस्थापन, बार मॉल हे सर्व सुरू आहे. परंतु, शाळा महाविद्यालये बंद ठेवणे म्हणजे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात लोटणे सारखे असून शासनाने तत्काळ शाळा महाविद्यालये सुरू करावीत अशी मागणी करण्यात येत होती.