मुंबई विमानतळावर ११ कोटींचं कोकेन तर साडेसहा कोटींचं सोनं जप्त
![Cocaine worth 11 crores and gold worth six and a half crores seized at Mumbai airport](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Mumbai-Airport-780x470.jpg)
मुंबई | गेल्या आठवड्यात मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने केलेल्या कारवाई दरम्यान साडे तीन कोटी रुपयांचे सोने जप्त केले आहे. दुबई, सिंगापूर, अबुधाबी येथून प्रामुख्याने या सोन्याची तस्करी मुंबईत झाल्याची माहिती आहे. सोन्याची पेस्ट आणि सोन्याची पावडर या रुपात सोने भारतात आणण्यात आले होते. इतक्या मोठ्या कारवाईनंतरही ही तस्करी थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही.
Mumbai Customs,seized over 10.68 Kg Gold valued at 6.30 Cr, electronic goods, Foreign currency, assorted cosmetics across 22 cases. Gold was concealed in check-in bag, hand bag, clothes worn, on body of pax, body cavity, padlock.#mumbai#mumbaiairport@CSMIA_Official pic.twitter.com/ydLg8Pn7de
— Indrajeet chaubey (@indrajeet8080) March 31, 2024
हेही वाचा – आजपासून झाले मोठे बदल! खिशावर भार पडणार!
प्राप्त माहितीनुसार, मुंबई कस्टम्सने २२ प्रकरणांमध्ये ६.३० कोटी मूल्याचे १०.६८ किलो सोने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, विदेशी चलन, विविध प्रकारचे सौंदर्य प्रसाधने जप्त केले. चेक-इन बॅग, हातातील बॅग, परिधान केलेले कपडे, शरीरावर पॅक्स, शरीरातील पोकळी, पॅडलॉक यामध्ये सोने लपवले होते. तर दुसरीकडे डीआरआयने परदेशी महिलेच्या शरीरातून कोकेन ड्रग्जच्या ७४ कॅप्सूल जप्त केल्या. याचं बाजारात मूल्य ११ कोटी रुपये इतके आहे.