बदलापुरातील चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणी नागरिक आक्रमक, पालकांचं शाळेसमोर आंदोलन
![Citizens are aggressive in the case of torture of minor girls in Badlapur](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/Badlapur-School-780x470.jpg)
Badlapur School | बदलापूरमध्ये झालेल्या अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचारामुळे महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे. बदलापूरमधील एका नामांकित शाळेमध्ये एका साडे तीन वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. या घटनेच्या विरोधात मंगळवारी संतप्त पालक आणि बदलापुरकरांनी हजारोंच्या संख्येने शाळेबाहेर जमत निदर्शन केले. आरोपीला कठोर शिक्षा यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आली.
बदलापुरात अल्पवयीन चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे, संतप्त पालकांनी आज शाळेच्या गेटवर आक्रमक होत आंदोलन सुरू केल आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पालक आक्रमक झाले आहेत. यावेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त शाळेच्या गेटवर तैनात करण्यात आला आहे. या आंदोलनामध्ये आणि अल्पवयीन मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक आक्रमक झाले आहेत.
हेही वाचा – खासदार सुप्रिया सुळेंच्या कार्यक्रमात महिलांचा लाडू वरून वाद, व्हिडीओ व्हायरल
यामध्ये शाळेमधील पालक, राजकीय मंडळी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळेसमोर आंदोलन सुरु केले आहे. पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या मुलींच्या पालकांना तब्बल १२ तास ताटकळत ठेवण्यात आले होते. आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे, यामध्ये रिक्षा चालक, व्यापारी संघटना, शाळा बस चालक देखील सहभागी झाले आहेत. घटनास्थळी सध्या पालक वर्ग शाळा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत आहेत.
बदलापुरात स्थानिकांकडून रेल रोको
आदर्श शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ नागरिक रेल्वे स्थानकावर रेल्वे ट्रॅकवर उतरले असून न्याय मिळावा यासाठी घोषणाबाजी करत आहे.