Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नागपूर कारखान्यातील स्फोट दुर्घटनेवर शोक व्यक्त
मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Untitled-design-13-780x470.jpg)
नागपूर : नागपुरातील एका उपकरण निर्मिती कारखान्यात झालेल्या स्फोटाच्या दुर्घटनेतील मृत्यूंबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना व्यक्त करून वारसांना पाच लाख रुपयांची मदत देण्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.
हेही वाचा – नागपुरातील कारखान्यात स्फोट, अनेकांचा बळी गेल्याची बातमी
या कारखान्यात संरक्षणदृष्ट्या महत्त्वाची उत्पादने निर्माण होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासन, पोलीस व संबंधित सर्व यंत्रणांना मदत व अनुषंगाने निर्देश दिले आहेत. या दुर्दैवी घटनेतील जखमींना वेळेत व दर्जेदार उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या आहेत.