breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्याच्या अनेक भागात पाऊस आणि गारपिटीची शक्यता

पुणे | राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. वादळीवारा आणि गारपीटीसह होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशातच, भारतीय हवामान खात्याने आज पुन्हा राज्याच्या अनेक भागात पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याने अकोला, वाशिम आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. तसेच हवामान खात्याने या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचाही इशारा दिला आहे. याशिवाय बुलडाणा, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्येही आज ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आलेला आहे. इथेही वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील उर्वरित जिल्हे, संपूर्ण मराठवाडा, नगर, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

हेही वाचा    –    पुणे जिल्ह्यात दोन विविध घटनांमध्ये ६५ लाख रुपयांची रोकड आणि वाहन जप्त 

विदर्भ आणि मराठवाड्यात १० ते १३ एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.राज्याच्या इतर भागात म्हणजेच पुण्यातही १५ व १७६ एप्रिल असा दोन दिवस हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर मुंबई आणि कोकणात मात्र वातावरण कोरडे राहील, असा अंदाज आहे. राज्यातील इतर प्रमुख शहरांमध्ये ढगाळ हवामानाचे सावट असून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button