पुण्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर; शहरात तब्बल २८०० सीसीटीव्ही कॅमेरे
![CCTV cameras eye on Pune; As many as 2800 CCTV cameras in the city](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/cctv-pune-780x470.jpg)
पुणे : पुणे शहर परिसरात महापालिका, पुणे पोलिसांनी १४०० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. शहरातील ज्या भागात गंभीर गुन्हे घडले आहे, तसेच महत्वाच्या ठिकाणी अतिरिक्त २८०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील महत्वाचा परिसरावर पोलिसांनी नजर राहील, अशी माहिती पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिली.
पुणे शहर परिसरात महापालिका आणि पोलिसांनी यापूर्वी १४०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. वाहतुकीच्या नियोजनासाठी १४०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. शहरातील गंभीर गुन्हे आणि घडामोडींवर पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवतात. शहरातील ज्या भागात गंभीर गुन्हे, तसेच अपघात घडले आहेत. अशा भागांची माहिती पोलिसांनी घेतली. गेल्या दहा वर्षात शहरात घडलेल्या गंभीर गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर शहरात नव्याने २८०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी सांगितले.
हेही वाचा – ‘मुंबईच्या वसतिगृहात तरुणीसोबत घडलेल्या घटनेला सरकार जबाबदार’; सुप्रिया सुळे आक्रमक
शहरातील गुन्हेगारी आणि वाहतुकीच्या नियोजनासाठी नव्याने २८०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू आहे. शहरातील महत्वाच्या १२४ चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहे. उर्वरित १३५ सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील महत्वाच्या संस्था, व्यावसायिकांचे सहाय घेण्यात येणार आहे. महत्वाच्या संस्था, व्यावसायिक, दुकानदारांनी त्यांचे कॅमेरे रस्त्याच्या दिशेने लावल्यास त्याचा निश्चित उपयोग होईल. महत्वाच्या संस्था, व्यावासायिक, दुकानदारांनी बसवलेले दहा हजार सीसीटीव्ही कॅमेरे पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी जोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे, असे रजनीश सेठ यांनी नमूद केले.