Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

निळी आणि लाल पूररेषेची फेरसर्वेक्षण करून नव्याने आखणी होणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मिशन- PCMC : महापालिका महाविजयासाठी भाजपाची वज्रमूठ

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड सहित संपूर्ण महाराष्ट्रमध्ये फेर सर्वेक्षण करून निळी आणि लाल पूररेषा नव्याने आखणी करण्यात येणार आहे. “फ्लड मेटिगेशन मेजर्स”नुसार कोल्हापूरच्या धर्तीवर नवा डीसीपीआर केला जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकुर्डी येथील सभेत शनिवारी सांगितले.

पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या अधिकृत उमेदवारांसाठी आकुर्डी विठ्ठल मंदिर येथे शनिवारी (दि १०) मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत सभा पार पडली . निवडणूक प्रचार प्रमुख शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे उमा खापरे ,शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यावेळी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, निळी आणि लाल पूररेषेचा प्रश्न युनिफाईड डीसीपीआरमुळे निर्माण झाला. यातील काही तरतुदींमुळे तांत्रिक अडचण आली आहे. नदी लगतच्या अनेक भागांमध्ये नवीन डेव्हलपमेंट थांबलेली आहे. निळी आणि लाल पुररेषा हा 100 वर्षांपूर्वीच्या गृहीतकांवर आधारित आहे. त्या वेळच्या पूररेषेच्या मार्किंगनुसार ही रेषा ठरली होती . या संदर्भात अनेक तक्रारी नागरिकांकडून येत आहे.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले कोल्हापूरमध्ये निळ्या आणि लाल पूररेषे संदर्भात नव्याने डीसीपीआर करण्यात आला. या आराखड्यानुसार एखाद्या परिस्थितीमध्ये पूर संभाव्य स्थिती उद्भवली तर कशा पद्धतीचे बांधकाम असले पाहिजे. याबाबत नवीन नियम केले आणि हे नियम लोकांनी स्वीकारले . त्या पद्धतीने बांधकामे केली.

हेही वाचा –  ११ व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ दरम्यान आयोजन

पिंपरी चिंचवडमध्ये ज्या भागात निळी आणि लाल पुररेषा संदर्भात प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी सॅटॅलाइट इमेजचा वापर करून, जीआयओ स्पेशल डेटाचा वापर केला जाणार आहे. “फ्लड मिटीगेशन सिस्टिम”चा वापर केला जात आहे. पुढच्या काळात युनिफाईड डीसीपीआरमध्ये देखील बदल केला जाईल. आणि पिंपरी चिंचवड शहरातील निळी व लाल पुर रेषेसंदर्भातला प्रश्न कायमचा निकालात काढण्यात येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला.

जीसीसी हबमुळे पिंपरी चिंचवड विकासाच्या केंद्रस्थानी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले यापूर्वी पुणे जिल्हा म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग, टेक्नॉलॉजीचे हब होता. मात्र आगामी काळात पुणे जिल्हा हा जीसीसी हब म्हणून ओळखला जाणार आहे. भारतातील 25% जीसीसी इन्व्हेस्टमेंट एकट्या पुणे जिल्ह्यात होणार असून, त्यामध्ये पिंपरी चिंचवड केंद्रस्थानी असेल. पुढच्या पाच वर्षात पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या दुपटीने वाढणार आहे. त्याच दृष्टिकोनातून या भागात आपल्याला नियोजन करावे लागणार आहे.म्हणूनच एक विचाराचे सरकार आपल्याला आवश्यक आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या सभेत निळी आणि लाल पूररेषा, प्रॉपर्टी कार्ड, रेड झोन संदर्भात नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. वारंवार या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अधिवेशन, मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करून आपण प्रश्न मांडत आहोत. आज या सभेच्या माध्यमातून नागरिकांना मोठा दिलासा देण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केले आहे.समस्त पिंपरी चिंचवडकर यासाठी त्यांचे आभारी राहतील.

– शंकर जगताप, निवडणूक प्रमुख, आमदार, पिंपरी चिंचवड.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button