Pune-Mumbai Expressway : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर आज पुन्हा ब्लॉक
![Block on Pune-Mumbai Expressway again today](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/pune-mumbai-expressway-780x470.jpg)
पुणे : पुणे-मुंबई महामार्गावर आज २ नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा ब्लॉक घेण्यात आला आहे. हा ब्लॉक दोन तासांचा आहे. दुपारी बारापासून ते दोनपर्यंत असा या ब्लॉकचा कावालधी आहे. या ब्लॉकदरम्यान पुण्याकडे येणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
आयटीएमएस अंतर्गत ओव्हरहेड गॅन्ट्री बसवण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. दुपारी १२ ते २ पर्यंत असा दोन तासांसाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. या कालावधीत सोमटने फाटा परिसरात ही गॅन्ट्री बसविण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून असे ब्लॉक घेतले जात आहेत.
हेही वाचा – ‘मनोज जरांगेंच्या जीवाचं काही बरंवाईट झालं तर..’; ठाकरे गटाचा मोदींवर हल्लाबोल
मुंबईहून पुणेकडे जाणारी सर्व वाहने एन. एच. ४ जुना मुंबई-पुणे महामार्गावरून वळवण्यात येणार आहेत. तर हलकी वाहने उर्से टोलनाक्यावरून तळेगाव चाकण लेनने उसे खिंड वडगाव फाटा चौक मार्गे एन. एच. ४ जुना मुंबई-पुणे महामार्गकडे वळवली जाणार आहे. या रस्त्यावरून पुढे वाहने पुणेच्या दिशेला मार्गस्थ करण्यात येणार आहेत.