बिरोबा-महालिंगराया’चा पालखी भेट सोहळा, कोरोना नियमांचे मात्र तीनतेरा
![Biroba-Mahalingaraya's palanquin visit ceremony, but thirteen of the Corona rules](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/IMG-20211030-WA0002-1.jpg)
सोलापूर – सोलापूर जिल्ह्यातील हुन्नूर येथील ग्रामदैवत गुरु बिरोबा आणि हुलजंती येथील शिष्य महालिंगराया यांच्या भेटीचा अभूतपूर्व सोहळा नुकतासाच हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी बिरोबा – महालिंगरायाच चांगभलं अशा जयघोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. ढोल, झांज, हलगी, डफ, संबळाच्या तालात भाविक भक्तीरसात न्हाऊन निघाले होते यावेळी कोरोना नियमांचे मात्र तीनतेरा वाजल्याचे दिसून आले .
मागीलवर्षी कोरोनाचा संसर्ग वाढला असल्यामुळे हा भव्यदिव्य सोहळा इतक्या थाटात होऊ शकला नव्हता. मात्र सध्या सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने घटत असल्याने हा नयनरम्य सोहळा भक्तांना साजरा करता आला.दरम्यान, शासनाने घालून दिलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांचे तीनतेरा वाजल्याचे एकूणच चित्र या सोहळ्यात स्पष्ट दिसून येत आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यात घटत जाणारी कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढल्यास नवल वाटायला नको.