breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोन्याच्या किमतीत मोठी वाढ, १० ग्रॅमचा दर आता पोहोचला…

Gold-Silver Price Today :  सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे सोन्याला नवी झळाळी मिळाली असून सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे.१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६५,४९० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६४,९३० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, ७३,९५० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७३,१७० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

हेही वाचा – पुण्यातील खडकवासला परिसरात जमावाचा धारदार शस्त्रांनी एकमेकांवर हल्ला, व्हिडीओ व्हायरल

२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.

२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.

२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.

१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.

१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५९,९०४ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६५,३५० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५९,९०४ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६५,३५० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५९,९०४ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६५,३५० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५९,९०४ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६५,३५० रुपये आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button