उद्योगपती गौतम अदानींच्या संपत्तीत मोठी घट
![Big decline in the wealth of industrialist Gautam Adani](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/gautam-adani-780x470.jpg)
२४ तासांत ६.५ अब्ज डॉलरची म्हणजेच ५४००० कोटी रूपयांची घट
मुंबई : अदानी समूह आणि हिंडेनबर्ग यांच्यातील वाद आता आणखी चिघळला आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क स्थित, हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहातील कंपन्यांवर गंभीर आरोप केले. ज्याचे जगभरात पडसाद उमटले आहेत. यानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांना शेअर बाजारात मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून गुंतवणूकदारांना मालामाल करणाऱ्या अदानी समूहाच्या ९ कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली. यामुळे अदानी समूहाने हजारो कोटींचं भांडवल गमावलं आहे. अदानी यांच्या संपत्तीत मोठी घट झाली.
अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरात झालेल्या घसरणीचा फटका गौतम अदानी यांना बसला आहे. एका दिवसात अदानी यांच्या संपतीत ६.५ अब्ज डॉलरची म्हणजेच सुमारे ५४००० कोटी रूपयांची घट झाली आहे. दरम्यान फर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार गौतम अदानी यांची संपत्ती ५.१७ टक्क्यांनी घटून ती ११९.१ अब्ज इतकी झाली आहे.
हिंडेनबर्गच्या अहवालानुसार, अदानी ग्रुपने आपल्या कंपन्यांना ८५ टक्क्यांपेक्षा अधिक मूल्यावान दाखविण्यात आले आहे. तसेच, अदानी समूह मोठ्या कर्जामुळे दबावाखाली येऊ शकतो. अदानी समूहात सर्व काही ठीक नसल्याचा दावा करण्यात आला आहे. हा समूह अनेक दशकांपासून स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंट फ्रॉडमध्ये गुंतलेला आहे, असं या अहवालात म्हटलं आहे.