न्यूझीलंडविरूद्धच्या तिसरा वनडेसाठी भारतीय संघात मोठा बदल
![Big change in Indian team for third ODI against New Zealand](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/india-vs-new-zealand-780x470.jpg)
भारतीय संघात उमरान मलिक आणि युझवेंद्र चहल या खेळाडूंना संधी
मुंबई : भारत विरुद्ध न्यूझीलंड आज तिसरा वनडे सामना आहे. आजच्या सामन्यात न्यूझीलंड विजयाचे खाते उघडते की भारत आजचाही सामना जिंकतो याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात इंदूरच्या होळकर स्टेडियमवर आज तिसरा आणि मालिकेतील अखेरचा वनडे सामना होणार आहे
भारतीय संघाने पहिल्या दोन्ही सामन्यांत सरशी साधत मालिकेत विजयी आघाडी मिळवली आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात भारतीय संघात उमरान मलिक आणि युझवेंद्र चहल यांना संधी देण्यात आली आहे. हा सामना दुपारी 1.30 वाजता सुरू होणार आहे.
भारताचा एकदिवसीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, उमरान मलिक.
न्यूझीलंडचा संभाव्य एकदिवसीय संघ :
फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकिपर/कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, जेकब डफी, डग ब्रेसवेल, मार्क चॅपमन, हेन्री शिपले.