हिंजवडीतील बगाड ही मधोमध तुटला, बगाड यात्रेतील बगाड तुटण्याची ही पाहीलिच वेळ
पुण्यातील एकाच दिवशी दोन बगाड यात्रेतील घटना
![Hinjewadi, Bagad, broken in the middle, Bagad, Bagad in Yatra,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/Bagad-780x470.png)
पिंपरी :
पिंपरी चिंचवडलगतच्या हिंजवडीतील बगाड ही मधोमध तुटलं अन बगाडचे यंदाचे गळकरी खाली कोसळले. सुदैवाने यात त्यांना कोणतीही गंभीर इजा झाली नाही. हिंजवडी गावातील म्हातोबा देवाची आज यात्रा होती. अनेक वर्षांच्या परंपरेनुसार या यात्रेत बगाडाची प्रथा आहे. यंदा श्रीधर जांभुळकर यांना गळकरीचा मान होता. सायंकाळी बगाड सुरू झालं, हेलिकॉप्टर ने पुष्पवृष्टी सुरू झाली. तेंव्हाच हे बगाड मधोमध तुटलं. सुदैवाने यात त्यांना कोणतीही गंभीर इजा झाली नाही. काल पुण्यातील जुन्नर तालुक्यात ही अशीच घटना घडली. पारुंडे गावातील यात्रेतील बगाडाची प्रदक्षिणा सुरू असतानाच ते मधोमध तुटलं अन दोन मानकरी जखमी झाले होते.
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुका आणि जुन्नर तालुक्यातील दोन ठिकाणी निघालेल्या बगाड यात्रेदरम्या बगाड मोडण्याच्या घटना घडल्या. जुन्नर तालुक्यातील यात्रेत बगाड कोसळल्याने दोघेजण जखमी झाले. तर मुळशी तालुक्यातील बगाड यात्रेदरम्यान सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. मात्र बगाड कोसळल्याने रिंगण सोहळा होऊ शकला नाही.
वाकड-हिंजवडीसह अवघ्या मुळशी तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या श्री म्हातोबा देवाची यात्रा हनुमान जयंतीला होत असते. यावर्षी बगाड यात्रा होती. गुरुवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास हिंजवडी गावठाणातून वाकडकडे बगाड निघाले. मात्र काही अंतर आल्यानंतर बगाडाची शासनकाठी मधोमध तुटली. यामुळे बगाडाचा रिंगण सोहळा होऊ शकला नाही. बगाड यात्रेत हजारो भावी सहभागी झाले होते. दरम्यान ऐतिहासिक बगाडावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली होती. पुष्पवृष्टी वेळी भाविकांमध्ये मोठा उत्साह होता. बगाड मोडण्याची दुर्घटना प्रथमच वाकड, हिंजवडीमध्ये बगाडाची शेकडो वर्षांची परंपरा आहे. यामध्ये प्रथमच बगाड मोडण्याची घटना घडली आहे