ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रमुंबई

विजयादशमीनिमित्त संघर्ष करणाऱ्या दहा महिलांचा “आशा दुर्गा सन्मान”

राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आणि अंघोळीची गोळी संस्थेचे अध्यक्ष माधव पाटील यांचे आयोजन

पिंपरीः अनेक महिला विविध क्षेत्रात प्रगति करत असतात. परंतु, काही महिला आयुष्यभर संघर्ष करत असतात. संघर्ष करून आपल्या संसाराला आकार देतात. त्यांच्या संघर्षाने अनेकांनी प्रेरणा घ्यावी, म्हणूनच राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आणि अंघोळीची गोळी संस्थेचे अध्यक्ष माधव पाटील यांनी समाजातील संघर्ष करणाऱ्या दहा महिलांचा “आशा दुर्गा सन्मान” देऊन सन्मान केला. यावेळी नीता चौगुले, रुचिता बंडी, नीता रसाळ, शकुंतला कुऱ्हाडे, माधुरी चौगुले, वनिता राठोड, रेखा माटे, चंद्रकला इंदूरकर, उर्मिला चौरे आणि बबिता गायकवाड या संघर्ष केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला.

माझ्या आईने गेली ३५ वर्षे पोस्टाचे पैसे गोळा करून , छोटे मोठे शिवणकाम करून मला आणि माझ्या भावंडांना शिक्षण दिले म्हणूनच आईच्या नावाने ” आशा दुर्गा सन्मान हा सोहळा घेत आहे, असे माधव पाटील म्हणाले. हा सन्मान आईचा सन्मान होता म्हणूनच माधव पाटील यांची आई आशा धनवे आणि प्रेमलोक पार्क मित्र मंडळातील युवा कार्यकर्त्यांकडून या दहा आईंचा सन्मान करण्यात आला. यावेळी माधव पाटील यांनी प्रत्येक आईची संघर्षाची गोष्ट सांगितली. अवघ्या ३-४ वर्षाच्या संसारानंतर पती गेले पण नीता चौगुले यांनी मुंबईला नोकरीला अपडाऊन करून दोन मुलांना सांभाळले. रुचिता बंडी या प्रेमलोक पार्कमधील १०० फ्लॅट असणाऱ्या एल नक्षत्रम या सोसायटीच्या चेयरमन आहेत आणि दर महिन्याला ६० किलो प्लास्टिक रिसायकल करतात. नीता रसाळ या १४० जणांचे अनाथ आश्रम चालवतात. शिवणकाम करून त्यांनी अनाथाश्रम उभारला. शकुंतला कुऱ्हाडे मंदीरात राहिल्या, त्यांनी बांधकाम साईटवर विटा आणि मातीची ओझी वाहून तीन मुलींची लग्न केली. तर मुलाला एमसीए पर्यंत शिकवले. माधुरी चौगुले यांनी पती गेल्यावर खानावळ आणि पाळणाघर सुरु करून मुलांना शिकवले. मुलींना शिकवायचेच म्हणून वनिता राठोड यांनी शिवणकाम, डबे करणे, फराळ बनवून देणे, रांगोळी काढून देणे, अशी अनेक कामे करून दोन्हीही मुलींना चांगले शिक्षण दिले. रेखा माटे यांनी शिवणकाम केले, चहा आणि वडापाव विकून संसाराची चाके ओढली. चंद्रकला इंदूरकर यांनी ३० वर्षे शिवणकाम केले आणि मुलांना उच्चशिक्षित करून मेक्सिको सारख्या देशात काम करण्यास पाठवले. उर्मिला चौरे यांनी बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना विविध कलागुण शिकवले, अनेक महिलांना पैसे न घेता शिवणकाम शिकवले. बबिता गायकवाड यांनी घर चालवण्यासाठी दवाखान्यात मावशी म्हणून काम केले. तिथे साफसफाईची सर्व कामे केली. या संघर्ष केलेल्या महिलांचा सत्कार केल्याबद्दल प्रेमलोक पार्क परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

यासाठी नीता पोईपकर, अजित जाधव, सुमेध पानसे, नेल्सन अरुलदास, निखिल पोईपकर, मंडळाचे अध्यक्ष निखिल चिंचवडे आणि प्रेमलोक पार्क मित्र मंडळाचे कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button