Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

माजलगावमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; दोघे ताब्यात, चौघांवर गुन्हा… लातूरचे काय कनेक्शन?

छत्रपती संभाजीनगर : अहिल्यानगरच्या फैजान ए-कन्झूल इमान या ट्रस्टचा नोंदणी क्रमांक वापरून गुलजार ए-रझा ट्रस्टच्या नावाने लातूरमध्ये पाच वेगवेगळी खाते उघडून धार्मिक कामाच्या नावाखाली चार कोटी ७३ लाख ६७ हजार ५०३ रुपयांचा निधी जमा करण्यात आला. संबंधित रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी वापरण्यात आल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या दहशतवाद विरोधी पथकाने बीड जिल्ह्यातील माजलगाव शहराजवळील पात्रुड गावात गुरुवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास छापा मारून दोघांना ताब्यात घेतले. तर चार जणांविरुद्ध माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईबाबत बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काॅवत यांनी दुजोरा दिला आहे.

इमरान कलीम शेख (सदर बाजार, अंबाजोगाई), मुज्जम्मिल नूर सय्यद (सत्तार गल्ली पात्रुड), अहमदुद्दीन कैसर काझी (रोजा मोहल्ला, केज) व तौफीक जावेद काझी, अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. यातील मुज्जम्मिल नूर व अहमदुद्दीन काझी या दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या संदर्भाने मिळालेल्या माहितीनुसार वरील आरोपींनी पात्रुडमध्ये गुलजार ए रझा या नावाच्या ट्रस्टचा फलक लावला होता. निती आयोगाच्या नियमानुसार ट्रस्टची नोंदणी दर्पण पोर्टलवर करणे आवश्यक आहे.

हेही वाचा –  WPL 2026 बिगुल वाजलं! पहिल्याच सामन्यात मुंबई आणि आरसीबी आमनेसामने; फ्रीमध्ये कुठे पाहता येणार? जाणून घ्या

मात्र, गुलजार ए रझाचे चुकीच्या पद्धतीने नोंदणी केल्याचे कागदपत्रांच्या पडताळणीमध्ये आढळून आले. या न्यासाच्या नावाने लातूरमधील ॲक्सिस बँकेमध्ये पाच बोगस खाते तयार करण्यात आले होते. त्यामध्ये चार कोटी रुपये जमा करण्यात आले होते. हा निधी धार्मिक कामाच्या संदर्भाने जमा करण्यात येत असल्याची माहिती आहे. गुलजार ए रझाची बीड जिल्ह्यातील ११ ही तालुक्यांमधील दुय्यम निबंधक कार्यालयांकडून माहिती घेतली असता तेथेही त्यांची नाेंदणी आढळून आली नाही.

महाराष्ट्रामध्ये काेणत्याही ट्रस्ट किंवा संस्थेने त्यांची डीड नाेंदणी धर्मादाय आयुक्तांकडे करणे आवश्यक आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडूनही वरील ट्रस्टची माहिती घेतली असता त्यांच्याकडे नाेंदणी नसल्याचे कळवले आहे, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ज्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे ताे इम्रान शेख हा गुलजार ए रझा ट्रस्टचा अध्यक्ष, सय्यद मुज्जम्मिल हा उपाध्यक्ष, असमदुद्दीन कैसर काझी हा सचिव तर ताैफीक काझी याचा विश्वस्त म्हणून बँकेच्या खात्यांमध्ये नाेंदणी असल्याची माहिती पुढे आली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button